पुण्यातील जनवाडी परिसरात वाहनांची तोडफोड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चतुशृंगी परिसरात जनवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. दारू पिऊन आलेल्या तिघांनी ही तोडफोड केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी शामू लक्ष्मण धोत्रे (वय ४२, रा. जनवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयान इनामदार व त्याच्या दोन साथीदारांवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पॅगो रिक्षा जनवाडीतील मॅफको कंपनीजवळ रस्त्यावर उभी केली होती. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आलेल्या आरोपींनी त्यांची रिक्षा व इतर कार अशा चार वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर पसार झाले. आरोपींनी मद्यपान केल्याचे माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे.