Pune Crime News | हडपसरमधील ‘रॉयल एनफिल्ड’ शोरुमध्ये तीन लाखांची चोरी, सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हडपसर येथील रॉयल एनफिल्ड शोरुमच्या (Royal Enfield Showroom Hadapsar) कॅश काऊंटरमधील तीन लाखांच्या रक्केमवर सुरक्षा रक्षकाने (Security Guard) डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता घडली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी अजहार काझी (वय-30 रा. रास्ता पेठ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. सुरक्षा रक्षक प्रमोद कुमार (वय-29 रा. उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर आयपीसी 381 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पैसे घेऊन फरार झाला असून पोलीस (Pune Police) त्याचा शोध घेत आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद कुमार हा हडपसर मधील शेवाळवाडी येथील प्लॅटिनम ऑटो या
रॉयल एनफील्ड बुलेटच्या शोरुमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तर फिर्यादी हे ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतात.
प्रमोद कुमार याने कर्मचारी व व्यवस्थापक यांची नजर चुकवून कॅश काऊंटरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये चोरी करुन
पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या विनोद सोमवंशी व त्याच्या 12 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 79 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Tamannaah Bhatia Superbold Photo | पारंपारिक आणि मॉर्डनही… तमन्ना भाटीयाच्या व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावली आग !

Pune Crime News | घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला खडक पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त