Pune Crime News | महाराष्ट्र बोर्डासारखी वेबसाईट तयार करुन दिले 700 जणांना बनावट प्रमाणपत्र; छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठ …

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बनावट शैक्षणिक प्रमाण पत्र बनविणार्‍या टोळीने चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुलसारखी बनावट वेबसाईट बनवून त्याद्वारे तब्बल ७०० जणांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्तित्वात नसलेल्या एका विद्यापीठची एक वेब साईट तयार केली.

 

दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून संदीप कांबळे याला पकडले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कांबळे याने कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव), सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम (रा. संभाजीनगर) यांना अटक केली होती.

 

त्यांच्याकडे अधिक तपास करताना त्यांनी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुल १० वी यांच्यासारखी दिसणारी वेबसाईट तयार केली होती.
त्याद्वारे त्यांनी नापास असलेल्या, पण वेगवेगळ्या कारणासाठी दहावी पास प्रमाणपत्र आवश्यक
असलेल्यांना ३० ते ५० हजार रुपये घेऊन प्रमाणपत्रे देत होते.
त्यांनी हा प्रकार २०१९ पासून सुरु केला होता.
आतापर्यंतच्या तपासात तब्बल ७०० जणांना त्यांनी पैसे घेऊन प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | 700 people were given fake certificates by creating a website similar to Maharashtra Board; University in Chhatrapati Sambhajinagar…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Sudhir Mungantiwar | ‘अजित पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या  बाटल्या…’, सुधीर मुनगंटीवार यांचा खळबळजनक आरोप