Pune Crime News | पुण्यातील बिबवेवाडीत युवकाचा दगडाने ठेचून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील बिबवेवाडी परिसरात शिवीगाळ केल्याने एका युवकाचा दगडाने ठेचून खून (Murder In Pune) करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये (Bibvewadi Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

श्रीकांत मच्छिंद्र जाधव Shrikant Machindra Jadhav (38, रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पारेकर (Sunil Parekar) आणि त्याच्या दोन साथीदारांविरूध्द (रा. बिबवेवाडी) भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याने दोन आठवड्यापुर्वी सुनील पारेकर यांच्या घरासमोर शिवीगाळ केली होती. त्यावेळी पारेकरने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगितले होते. त्यावरून त्यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला होता. बुधवारी रात्री श्रीकांत जाधव बिबवेवाडी डॉल्फिन चौकाजवळील (Dolphin Chowk Bibwewadi) हर्ष टेलरच्या दुकानासमोर थांबला असताना पुन्हा सुनील पारेकरशी वाद झाला. पारेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून श्रीकांतचा दगडाने ठेचून बेदम मारहाण केली. त्यामध्ये श्रीकांत गंभीर जखमी झाला.

बिबवेवाडी पोलिसांनी त्याला भारती हॉस्पीटलमध्ये (Bharti Hospital Pune) उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र, गुरूवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. बिबवेवाडी पोलिस गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :  Pune Crime News | A youth was stoned to death in Pune’s Bibwewadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा