Pune Crime News | लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये वाद, अश्लील मेसेज करुन तरुणीचा विनयभंग; पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहणाऱ्या तरुणीने लग्नास नकार दिल्याने तरुणीचा वारंवार पाठलाग करुन, तसेच तिला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मे 2023 ते आजपर्यंत कल्याणीनगर (Kalyani Nagar) येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत भोसरी (Bhosari) येथे राहणाऱ्या 26 वर्षीय पीडित तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मनीष ज्ञानेश्वर टेकाळे Manish Dnyaneshwar Tekale (वय-26 रा. मोशी, पुणे) याच्यावर आयपीसी 354(ड), 507 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी हे मागील 9 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
फिर्य़ादी यांनी मे 2023 मध्ये आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. यानंतर आरोपीने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे,
व्यक्तींद्वीरे, फोन, मेसेज करुन तरुणीचा पाठलाग केला.
तसेच तिला शिवीगाळ करुन दमदाटी केली. आरोपीने तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर
सतत फोन करुन मेसेज करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नांगरे (PSI Dattatray Nangre) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड