Pune Crime News | MPSC करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करुन लुटण्याचा प्रयत्न, टिळक रोडवरील हल्ल्याचा थरार; 3 सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) भरदिवसा एका विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack in Pune) केल्याची घटना घडली होती. त्यानंतर अशाच प्रकारची घटना टिळक रोडवर (Tilak Road) घडली आहे. स्पर्धा परिक्षेची (MPSC) तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर बुधवारी (दि.6) पहाटे हा हल्ला झाला. (Pune Crime News) पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हा घडल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) अवघ्या दोन तासात तिघांना पानमळा परिसरातून अटक (Arrest) केली आहे.

आदित्य जीवन गायकवाड (Aditya Jeevan Gaikwad), साहिल शंकर वाघमारे (Sahil Shankar Waghmare) व अनिकेत संग्राम सरोदे Aniket Sangram Sarode (तिघे रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत बालाजी यल्लपा आरोटे Balaji Yallapa Arote (वय-19 मुळ रा. नांदेड) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या टिळक रस्त्यावर हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाला आहे. (Pune Crime News)

बालाजी आणि त्याचे मित्र कुणाल शेवाळे व ओम भिलारे हे सदाशिव पेठातील एका अभ्यासिकेत अभ्यास करतात. ते तिघे बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अभ्यासिकेतून घरी जात होते. टिळक रोडवरील शक्ती स्पोर्ट्स दुकानासमोर (Shakti Sports Shop) आल्यानंतर त्यांच्यामागून एका दुचाकीवरुन तिघेजण आले. त्यातील एकाने दुचाकीवरुन खाली उतरुन तिघांना अडवून पैशांची मागणी केली.

त्यांच्यात वाद झाल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी याच्यासह दोघांवर हल्ला केला.
मात्र तिघांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले.
सुदैवाने या घटनेत फिर्यादी यांच्यासह त्यांच्या मित्रांना गंभीर दुखापत झाली नाही,
असे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन आरोपींना अटक केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रास्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद राहणार; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’,
भाजपचा हल्लाबोल

Aaditya Thackeray | ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; वाचून दाखवला महायुती सरकारच्या तक्रारींचा पाढा