Pune Crime News | तारण ठेवलेले दागिने मोडून जबरदस्तीने कार नेली; 18 लाखांची मागणी करणाऱ्या सावकराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्यावसायासाठी मित्राचे साडेचौदा तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) तारण ठेवून १० लाख रुपये कर्ज (Loan) घेतले. पैसे परत केले असतानाही सोन्याचे दागिने परस्पर मोडून जबरदस्तीने कार घेऊन जाणार्‍या सावकाराला (Moneylender) खडक पोलिसांनी (Pune Police News) अटक केली आहे. (Pune Crime News)

सचिन बापू इंदापूरकर Sachin Bapu Indapurkar (वय ४६, रा. रवि किरण बिल्डिंग, शाहु चौक) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या व्यावसायिकाने खडक पोलिसांकडे (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२३) दिली आहे. फिर्यादी यांना व्यावसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी सचिन इंदापूरकर याच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने १० लाख रुपये घेतले होते. त्यासाठी त्यांनी मित्राचे साडेचौदा तोळे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. (Pune Crime News)

त्यांनी आरोपीला वेळोवेळी रोख व ऑनलाईन असे ४ लाख ७५ हजार रुपये देऊनही तारण ठेवलेले दागिने परस्पर मोडून त्यातून ५ लाख ३९ हजार रुपये घेतले. असे १० लाख १४ हजार रुपये परत घेऊनही फिर्यादी यांची चारचाकी इनोव्हा कार (Innova Car) सह्या घेऊन गाडी घेऊन गेला. गाडी परत मागितली असताना त्याने मुद्दल व व्याज असे आणखी १८ लाख रुपये मागून त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याने फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Car was taken by force after breaking the pawned jewelry; A moneylender who demanded 18 lakhs was arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 4 July Rashifal : वृषभ, कर्क आणि तुळ राशीवाल्यांच्या इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या इतर राशींची स्थिती

Actress Radhika Madan | अभिनेत्री राधिका मदनचे नवे हॉट देसी फोटोशूट; नेटकऱ्यांच्या नजरा फोटोवर खिळल्या.

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Devendra Fadnavis | “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील” – देवेंद्र फडणवीसांची माहिती

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’