पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात कामानिमित्त आलेल्या एका परदेशी नागरिकाला पोलीस असल्याचे सांगून लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्यांना परदेशी नागरिकाचे 1100 डॉलर लुटून नेले. हा प्रकार एम.जी रोडवर 8 सप्टेंबर रोजी घडला आहे. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी यमन येथून आलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीवरुन, फिर्यादी हे यमन येथून पुण्यात कामानिमित्त आले होते. ते शॉपिंग करण्यासाठी एम.जी. रोड येथे आले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगून पोलिसांचे ओळखपत्र दाखवत बॅग तपासायची असल्याचे सांगितले. (Pune Crime News)
चोरट्यांनी फॉरेनरच्या बॅगेतील डॉलर मोजत असताना दोन हजार डॉलर्स पैकी 1100 डॉलर म्हणजेच भारतीय चलनातील 91 हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फॉरेनरने शुक्रवारी (दि.22) लष्कर पोलीस ठाणे गाठत फिर्य़ाद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसुडे करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…
विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू