Pune Pimpri Chinchwad Crime News | शस्त्र बाळगणाऱ्या तीन सराईतांना अटक, गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची विशेष मोहिम

Pune Pimpri Chinchwad Crime News | pistol-wielding terror in premises, incident in Nigdi; Criminal Arrested

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाकडून गणेशोत्सवात विशेष मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत पथकाने वाकड, देहूरोड आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असताना ते जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्र बाळगून होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दीपक आबा दाखले (वय-25 रा. रहाटणी) याला 7 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. पोलिसांची परवानगी न घेता तो शहरात आला होता. त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती पोलीस अंमलदार रामदास मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दीपक दाखले याला त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सत्तूर मिळाला असून त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर वाकड पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अमित गजानन वानरे (वय-32 रा. आदर्श नगर, किवळे, देहूरोड) याला 12 जुलै 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. तो देखील पोलिसांची परवानगी न घेता शहरात फिरत होता. यासंदर्भात पथकातील पोलीस अंमलदार शुभम कदम यांना माहिती मिळाली. पोलिसांनी अमित वानरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली. आरोपी विरोधात 2015 पासून देहूरोड, चिंचवड, निगडी, पिंपरी, रावेत, खडकी, तासगाव पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत.

मावळ परिसरातील सराईत गुन्हेगार समीर उर्फ सोन्या जालिंदर बोडके (वय-28 रा. गहुंजे गाव, ता. मावळ) याला 2 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. तो बेकायदेशीरपणे जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश मेदगे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन बोडके याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सत्तूर हे शस्त्र जप्त केले. समीर बोडके याच्या विरोधात 2014 पासून तळेगाव दाभाडे आणि देहूरोड पोलीस ठाण्यात 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हे शाखेला
विविध कारवाया करण्याचे तसेच अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडा विरोधी पथकाने विशेष मोहीम राबवून
सराईत गुन्हेगारांना अटक करुन शस्त्र जप्त केली आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Girish Mahajan On Eknath Khadse | ‘त्यांना सगळी पदं आपल्याच घरात पाहिजेत’, खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचा टोला

Teachers Recruitment In Maharashtra | टीईटी गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना संधी, स्व-प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…

विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

Total
0
Shares
Related Posts
Khadki Pune Crime News | Beat the driver and took the cab away! Two rickshaws, a car and a pedestrian were hit on the way

Pune Crime News | पुणे : धर्मांतराचा कट? ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी आणि डान्स करुन बरे होत असल्याचे सांगणाऱ्या पास्टर व सिस्टरवर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | Pimpri Municipal Corporation owes Rs 7 crore 55 lakh to the police; The topic of discussion in the city; Property on Lease for Police Station, Chowki with Commissionerate

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर