Pune Crime News | गणेशोत्सव व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील दोन सराईत गुन्हेगार तीन जिल्ह्यांतून हद्दपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सध्या पुणे शहरात सुरु असलेल्या गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर (Criminals On Pune Police Records) कारवाईचा बडगा उगारला आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma) यांनी जारी केले आहेत. (Pune Crime News)

गौरव गणेश धावडे (Gaurav Ganesh Dhawade) व प्रसाद नवनाथ कोळी (Prasad Navnath Koli) अशी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (Sr PI Kiran Balwadkar) व सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar) यांनी सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस उपायुक्तांनी दोघांना तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले. (Pune Crime News)

सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Pune Police Tadipari Action)

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार गौरव धावडे व प्रसाद कोळी यांच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, जमाव जमवून दहशत निर्माण करणे, महिलांची छेडछाड करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले होते. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख (PI Shabnam Shaikh)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे,
पोलीस हवालदार तानाजी नांगरे, शिवाजी दबडे, पोलीस नाईक भाऊसाहेब हजारे, पोलीस कॉन्स्टेबल समीर पवार,
अनिरुद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर व परमेश्वर पाडाळे यांनी गौरव रोकडे व प्रसाद कोळी
यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.आरोपींना पुणे शहर, पुणे जिल्हा, सोलापूर,
सातारा या जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. गौरव धावडे याला नगर तर प्रसाद कोळी याला उस्मानाबाद येथील नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Girish Mahajan On Eknath Khadse | ‘त्यांना सगळी पदं आपल्याच घरात पाहिजेत’, खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचा टोला

Teachers Recruitment In Maharashtra | टीईटी गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना संधी, स्व-प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…

विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू