Pune News | आखाती देशात नोकरीच्या आमिषाने महिलांची छळवणूक, राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांमुळे चार महिला मायदेशी परतल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आखाती देशात नोकरीच्या आमिषाने नेण्यात आलेल्या तीन महिलांचा छळ करण्यात आला. त्यांना वेळवर जेवण दिले नाही, मारहाण अशा प्रकारांना सामोरे जावे लागले. अखेर या महिलांनी राज्य महिला आयोगाशी (Maharashtra State Women’s Commission) संपर्क साधला. आयोगाने केलेल्या प्रयत्नांमुळे पुण्यातील तीन आणि चेन्नईतील एका महिलेला पुन्हा मायदेशात आणण्यात यश आले आहे. (Pune News)

मुंबईमधील एका दलालामार्फत पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील (Market Yard Pune) दोन महिला सौदी अरेबियात कामाला गेल्या होत्या. महिलांना चांगला पगार देण्याचे आमिष दखवण्यात आले होते. सौदी अरेबियात तीन महिला घरकाम करत होत्या. त्यांचे मालक त्यांना वेळेवर जेवण देत नव्हते. कामाची वेळ संपल्यानंतर त्यांना कामाला जुंपत होते. विरोध केला असता त्यांना मारहाण केली जात होती. त्यामुळे महिला नैराश्येत बुडाल्या होत्या. या महिलांनी समाजमाध्यमातून राज्य महिला आयोगाचा मोबाईल क्रमांक मिळवला. (Pune News)

त्यानंतर पुण्यातील तीन महिलांसह आणि चेन्नईतील एका महिलेला मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला. भारतीय दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सौदी अरेबियातील दूतावासाशी चर्चा केली. त्यानंतर महिलांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषदेत देली. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge) तसेच भारतात परतलेल्या पुण्यातील महिला उपस्थित होत्या.

मस्कतमधून महिलेची सुटका

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, जुलै महिन्यात पुणे पोलिसांनी मस्कतमधून एका महिलेला मायदेशी परतण्यासाठी मदत केली. पुण्यातील घोरपडे पेठेत राहणाऱ्या महिलेला नोकरीचे आमिष दाखविले होते. तिचा छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. याप्रकरणी एका दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातून 285 महिला बेपत्ता

लग्नाचे आमिष तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्यातील 285 मुलींना फूस लावून पळवून नेले होते.
ऑगस्ट अखेरपर्यंत पुण्यातून 285 मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आल्या होत्या. त्यापैकी 222 मुलींचा शोध पुणे पोलिसांनी घेतला आहे. 63 मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी ‘1091’ हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. मुलगी किंवा महिला बेपत्ता झाल्यास याची तक्रार हेल्पलाईनवर नोंदवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ

आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023 |गणेशोत्सवासाठी मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत करता येणार प्रवास;
जाणून घ्या वेळापत्रक

Rahul Narvekar | सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया;
म्हणाले – ‘मी दिरंगाई केलेली नाही…’

Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार,
अजित पवार समर्थक आक्रमक

Maharashtra Politics | ‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी; काँग्रेसचा महायुतीवर आरोप