Pune Crime News | क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीचे आमिष पडले महागात, जास्त परताव्याच्या लोभापायी गमावले 13 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सायबर गुन्हेगारीचे (Cyber Crime News) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक (Fraud) करण्याचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांना विविध ठिकाणी ऑनलाइन गुंतवणूक (online Invest) करण्यास सांगून फसवणूक केली जात आहे. असाच एक प्रकार पुण्यात तरुणाच्या बाबतीत घडला आहे.तरुणाला क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक (Crypto Trading Investment) केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची 13 लाख 76 हजार रुपयांची (Pune Crime News) फसवणूक केली आहे.

याप्रकरणी प्रविण नानासो रसाळ Pravin Nanaso Rasal (वय-30 रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलंग्रट सिंग सही असे नाव सांगणारा इसम व वॉलेट अड्रेसचे धारक व वापरकर्ते यांच्यावर आयपीसी 419, 420 व आयटी अॅक्टनुसार (IT Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2022 पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विलग्रट सिंग याने फिर्यादी प्रविण रसाळ यांना रिलायन्स फाउंडेशन (Reliance Foundation) या 1600 पेक्षा अधिक सदस्य असलेल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये
(Telegram Group) अॅड केले.
त्यानंतर ग्रुपमधील सदस्यांनी संगनमत करुन क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास खूप मोठा नफा मिळाल्याचे भासवले. आरोपींनी फिर्यादी यांना क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करुन कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 13 लाख 76 हजार 054
रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना या किमतीचे 2 लाख 60 हजार 758.988 ट्रॉन (TRX) हे नमूद वॉलेट अॅड्रेसवर पाठवण्यास भाग पाडले.
मात्र तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारचा नफा व त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता
आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील
(Senior Police Inspector Minal Patil) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Lured to invest in crypto trading at high prices, lost 13
lakhs in the lure of high returns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याचे निर्देश; जाणून घ्या काय आहे कारण

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

MSBSHSE Pune | दहावी-बारावी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेनंतर परिक्षा कक्षात प्रवेश नाही