Pune Crime News | घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | पुणे शहरातील घोरपडे पेठेत (Ghorpade Peth Murder Case) 30 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घरात शिरून अनिल रामदेव साहू (वय-35) याचा गोळी झाडून (Firing) खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या सुरेश लोधा व त्याच्या 3 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आयपीसी 302, 34 सह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करुन टोळी प्रमुख नवनाथ उर्फ नब्या सुरेश लोधा (वय-37 रा. घोरपडी पेठ, कृष्णा हाईट्स, पुणे), रोहित संपत कोमकर (वय-33 रा. गुरुवार पेठ, पुणे), गणेश उल्हासराव शिंदे (वय-41 रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे) आणि अमन दिपक परदेशी (वय-29 रा. घोरपडे पेठ, पुणे) यांना अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी आरोपी नवनाथ उर्फ नव्या लोधा याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता, त्याने संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीने जबरी चोरी, दरोडा टाकणे, धमकी देणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमाव जमविणे, दुखापत करणे, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

खकड पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने (Senior PI Sunil Mane) यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (DCP Sandeep Singh Gill) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (Addl CP Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर केला होता. प्राप्त प्रस्तावाची आणि कागदपत्रांची पडताळणी करुन मोक्का कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास फरासखाना विभागाचे (Faraskhana Division) सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल,
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने,
पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत (PI Sampatrao Raut),
सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर, पोलीस अंमलदार महेश पवार, नितीन जाधव, स्वप्नील बांदल यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली

‘कपिल शर्मा’च्या नावाने 10 वेळा फोन, अश्लील बोलून महिलेचा विनयभंग; कल्याणीनगर मधील घटना

पुण्यातील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक