Pune Crime News | दिघी येथील लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – दिघी येथील वडमुखवाडी परिसरातील लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Pune Crime News) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Police) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन लॉज मालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.20) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वडमुखवाडी परिसरातील खडीमशीन रोडवरील सनशाईन लॉज येथे केली आहे.(Pune Crime News)

नितीन रावसाहेब कोकरे (वय-28 रा. विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे (वय-38) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे.

वडमुखवाडी येथील सनशाईन लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्याच्या लॉजमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस फौजदार पारधी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी