Pune Crime News | विश्रांतवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) 17 जणांवर कारवाई (Pune Crime News) करुन 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.21) विश्रांतवाडी परिसरात केली.

विश्रांतवाडी परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण बेकायदेशीर मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. (Pune Crime News) त्यावेळी काही व्यक्ती मटका जुगार पैसे लावून खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पथकाने 16 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 17 जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी (Maharashtra Gambling Ban) कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तर ताब्यात घेतलेल्या 16 जणांना पुढील कारवाईसाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil),
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, इम्रान नदाफ,
इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Pune Crime News | Pune Police Crime Branch raided a gambling den in Vishrantwadi, action against 17 people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | आनंद दवेंकडून केवळ आणि केवळ भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार होतोय; हिंदू महासंघ आणि ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा आरोप, यापुढे दवे यांचा प्रचार न करण्याची भूमिका (Video)

IPL 2023 | CSK च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ खेळाडूचे टीममध्ये झाले पुनरागमन

Hruta Durgule | पोस्ट शेअर करत ऋता दुर्गुळेने केली मोठी घोषणा; म्हणाली “आजचा दिवस…”