Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार (Pune Rape Case) केला. या प्रकारातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर लग्नास नकार दिला (Lure Of Marriage). याप्रकरणी कोंढवा पोलीस (Pune Police) ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत कोंढवा बु. आणि हडपसर येथे वारंवार घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या 33 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुरुवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. यावरुन जमील इसाक मनियार (वय-37 रा. गुलटेकडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी तरुणीच्या घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या नकळत तिचे न्युड फोटो मोबाईलमध्ये काढले. यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून कोंढवा बु. आणि हडपसर येथे नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून तरुणी 7 आठवड्याची गर्भवती राहिली. मात्र, यानंतर आरोपी जमील याने लग्न करण्यास नकार दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली

‘कपिल शर्मा’च्या नावाने 10 वेळा फोन, अश्लील बोलून महिलेचा विनयभंग; कल्याणीनगर मधील घटना

पुण्यातील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक