Pune Crime News | पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग; NSUI च्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या (NSUI) अध्यक्षाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. अक्षय कांबळे असे या आरोपीचे नाव आहे.

अक्षय कांबळे (Akshay Kamble) विरोधात चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये (Chaturshrungi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Savitribai Phule Pune University (SPPU) एन्.एस्.यु.आय अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला आहे.

त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीला छळ केल्याचे गुन्हे ही दाखल केले आहेत.

संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनानेही कारवाई करावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे सचिवांना देण्यात आले आहे.अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना मेसेज करुन त्रास दिला आहे. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…