Pune Crime News | पुण्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे (pune crime news ) : पोलीसनामा ऑनलाइन – pune crime news |शहरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वानवडी, विश्रांतवाडी व हडपसर या भागात या घटना घडल्या आहेत. विश्रांतवाडीत झालेल्या अपघातात दिलीप राजू लष्करे (रा. मुंजाबा वस्ती धानोरी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (vishrantwadi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप हे 13 जून रोजी दुचाकीने घरी जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला त्याच्या दुुुचाकीची धडक बसली होती. या अपघातात दिकप हे गंभीर जखमी झाले होते. यात त्यांच्या तोंडाला, कपाळावर व डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

वानवडी पोलीस स्टेशनच्या (wanowrie police station) हद्दीतील मंमादेवी चौक पेट्रोल पंपाजवळ अज्ञात रिक्षाचालकाने सायकल वरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रकाश हरिभाऊ करंडे (वय 71, केदारी नगर गल्ली वानवडी) त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालक या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात (wanowrie police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

तसेच, सासवड रस्त्याने (Saswad Road) दुचाकी जाणाऱ्या दाम्पत्याला कारने उडवले. यात
बाळासाहेब मच्छिंद्र सोनार (वय 52) यांचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी वैशाली (वय 45) या जखमी
झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सासवड रोडने जात होते. या
दरम्यान एका कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असणारी दुसरी कार बाळासाहेब सोनार यांच्या
दुचाकी वर येऊन आदळली. यात बाळासाहेब व त्यांची पत्नी खाली कोसळल्या. यात बाळासाहेब हे
गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी वैशाली या देखील गंभीर जखमी झाल्या
आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. तर कार चालक आरंजय बुद्रुक (वय 35, रा. गाडीतळ) याला अटक केली आहे.

हे देखील वाचा

Union Cabinet Meeting | उद्या केंद्रीय कॅबिनेटची बैठक, महागाई भत्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune crime news | three peoples died in different accident in pune city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update