Pune : वैमनस्यातून दुचाकी जाळली, दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पूवैमनस्यातून दोघांनी दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी दोघांना अटक केली. येरवड्यातील यशवंत नगर परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली.

निलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय २१) आणि निखिल उर्फ पप्या संजय साळवे (वय २२, दोघेही रा. यशवंत नगर, येरवडा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एका साथीदार फरार आहे. याबाबत अमृता डाडर (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपुर्वी नीलेश उर्फ पिन्या आणि अमृता यांचा चुलत भाऊ यांची भांडणे झाली होती. त्याचा राग मनात होत. या रागातून निलेश उर्फ पिन्या आणि निखील उर्फ पप्या यांच्यासह एकाने संजय डाडर यांची दुचाकी जाळली. सहायक पोलिस निरीक्षक संजय करपे अधिक तपास करत आहे.