पुण्यात 36 वर्षीय बिल्डरचा 38 वर्षीय पत्नीकडून भरदिवसा खून, 6 वर्षापुर्वी झाला होता प्रेमविवाह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | पुण्यातील वानवडी परिसरात खळबजनक घटना घडली आहे. पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून (Pune Murder Case) केला. ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली आहे (Builder Murder In Pune). निखील पुष्पराज खन्ना Nikhil Pushparaj Khanna (वय-36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक (Builder In Pune) होते. याप्रकरणी रेणुका निखील खन्ना (वय-38 रा. वानवडी) यांना वानवडी पोलिसांनी (Pune Police) चौकशी करुन ताब्यात घेतले आहे.(Pune Crime News)

घरगुती भांडणातून (Domestic Dispute) झालेल्या वादातून रेणुका यांनी पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला. यानंतर सासरे डॉ. खन्ना यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले. त्यांनी निखील यांना तपासून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याबाबत वानवडी पोलिसांना (Wanwadi Police Station) कळवले. (Pune Crime News)

मयत निखील पुष्कराज खन्ना हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्या घरी आई-वडिल,
पत्नी असे चारजण राहतात. निखील आणि आरोपी पत्नी रेणुका यांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता.
पोलिसांनी आरोपी रेणुका यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’!
पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले