Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – सहकारमंत्र्याचे सचिव असल्याचे सांगून 59 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सहकारमंत्र्यांचे सचिव (Secretary to the Minister of Co-operation) असल्याचे सांगून गृहकर्ज (Home Loan) कमी करुन देतो, तसेच लिलाव झालेला बंगला परत मिळवून देतो, असे सांगून एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी तब्बल ५९ लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातला आहे. (Pune Crime News)
याबाबत येरवडा येथील एका ५९ वर्षाच्या नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोरख तनपुरे (वय ४०), विशाल पवार (वय ३५, दोघे रा. पुणे), गगन केशव रहांडगळे Gagan Keshav Rahandgale (वय ३८, रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगरमध्ये ऑक्टोबर २०२१ ते आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त असून त्यांची मुले चांगल्या पगाराची नोकरी करतात. त्यांनी कल्याणीनगर येथील बंगला विकत घेण्यासाठी एच डी एफ सी बँकेकडून (HDFC Bank) ४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, कोरोनाच्या काळात त्यांचे गृहकर्जाचे हप्ते थकले. त्यामुळे बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव करण्याची नोटीस बजावली होती. गोरख तनपुरे व विशाल पवार यांनी गगन रहांडगळे याची सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचे सचिव असल्याचे खोटे सांगून ओळख करुन दिली.
त्याने बँकेचे गृहकर्ज कमी करुन देतो, तसेच त्यांचे लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो,
असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या खात्यांवर पैसे आर टी जी एस (RTGS) करायला सांगितले.
फिर्यादी यांनी कल्याणीनगर (Kalyani Nagar) शाखा येथील बँक खात्यातून त्यांना एकूण ५९ लाख रुपये काढून दिले.
असे असताना त्यांचे काही एक काम केले नाही. त्यांचा लिलाव झालेला बंगलाही परत मिळवून दिला नाही (Fraud Case).
त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे परत मागितले. परंतु, त्यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केली.
तेव्हा त्यांनी आता पोलिसांकडे धाव घेऊन फिर्यादी असून सहायक पोलीस निरीखक रविंद्र आळेकर (API Ravindra Alekar) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Yerwada Police Station – Fraud of 59 lakhs by claiming to be Secretary of Cooperation Minister, case registered against three
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mahavitran HR Director Arvind Bhadikar | महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर यांची निवड
Mahavitaran Director Yogesh Gadkari | महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी योगेश गडकरी