Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी? प्रवाशाचा मृत्यू; दिवाळीला गावी जाणाऱ्या गर्दीत जीव गुदमरला, गाड्या न वाढविल्याचा परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्याहून -दानापूरला जाणार्‍या रेल्वेमध्ये चढत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा गुदमरुन मृत्यू झाला. पुणे रेल्वे स्टेशनवरील (Pune Railway Station) फलाट क्रमांक १ वर शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली. (Pune Crime)

 

साजन बलदेव मांझी Sajan Baldev Manjhi (वय ३०, रा. कांती नवादा, गया, बिहार) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो बिहारचा (Bihar) रहिवासी आहे. साजन व त्याचा पुतण्या गेल्या १५ दिवसांपूर्वी पुण्यात बिगारी कामाकरीता आले होते. या तरुणाचा दम्यामुळे मृत्यू झाल्याचा रेल्वे पोलिसांनी (Railway Police) दावा केला आहे.

 

दिवाळीनिमित्त (Diwali) गावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या खूप आहे. पुण्याहून सर्वाधिक प्रवाशांची गर्दी बिहारला जाणार्‍यांची असते. यंदा मात्र रेल्वेने हॉलिडे स्पेशल रेल्वे (Holiday Special Railway) सुरु करण्याऐवजी केवळ प्रमुख गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये वाढ केली. पुणे -दानापूर ही रेल्वे (Pune-Danapur Railway) गाडी वर्षाचे १२ ही महिने फुल्ल असते. तिला नेहमीच तीनशे ते चारशे प्रवाशांचे वेटिंग असते. दिवाळीत हे वेटिंग अगदी हजारापर्यंत गेले होते. तरीही मध्य रेल्वेने (Central Railway) पुण्याहून जादा गाड्या सोडल्या नाही. त्यामुळे आहे त्या गाड्यांमध्ये तोबा गर्दी झाली आहे. (Pune Crime)

शनिवारी या गाडीने जाण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या गाडीला सुरुवातीला व शेवटी असे प्रत्येकी २ -२ जनरल डबे जोडलेले असतात. आरक्षण न मिळालेले शेकडो प्रवाशांनी सर्वसाधारण डब्यातून जाण्यासाठी गर्दी केली होती. गाडी फलाट क्रमांक १ वर येत असताना शेवटच्या डब्यात चढण्यासाठी एकच चेंगराचेंगरी झाली. डबा पूर्ण भरला होता. त्यामुळे मांझी याला डब्यात चढणे अवघड झाले. त्यात आत चढणार्‍यांना आतील प्रवाशांनी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यातून एकच गोंधळ उडाला. त्यात मांझी हा खाली कोसळला. त्याचा पुतण्या त्याला घेऊन बाहेर आला. तोपर्यंत तो बेशुद्ध झाला. हे समजल्यावर पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशनवरील डॉक्टरांकडे नेले. त्यांनी तपासले असता त्याला मृत घोषित केले.

 

साजन मांझी याला दम्याचा त्रास होता. गर्दीत त्याला जोराचा खोकला आल्याने जीव घाबरा झाला.
नातेवाईकांनी त्याला मोकळ्या हवेसाठी बाहेर आणले. पण, त्याचा मृत्यू झाला.
चेंगराचेंगरी झाली नसल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Passenger dies in stampede at Pune railway station;
The crowd going to Bihar on Diwali choked to death, the result of not increasing the number of trains

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा