Pune Crime | संतापजनक ! 12 वर्षाच्या मुलाचा 4 वर्षाच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरामध्ये आई-वडिल दोघेही कामावर जात असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी डोळ्यात अंजन घालणारी आहे. पुणे शहराला (Pune Crime) लागून असलेल्या औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad) पालकांना खडबडून जागं करणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका 12 वर्षाच्या मुलाचे 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार (unnatural abuse) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार (Child Sexual Abuse Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही मुलांचे पालक उच्च शिक्षित आहेत.

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकांची डोकेदुखी वाढली आहे. आपली मुलं काय करतात, कुठे जातात, मोबाईलवर काय पाहतात हे पाहणं आवश्यक असल्याचे मत सांगवी पोलीस ठाण्याचे (Sangvi police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे (Senior Police Inspector Sunil Tonpe) यांनी व्यक्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाने चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अनैसर्गिक कृत करत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार मुलं राहात असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. मुलीने हा प्रकार आपल्या बहिणीला सांगितला तिने आईला याची माहिती दिली.

पीडित मुलीच्या आईने घटनेचे गांभीर्य ओळखून हा प्रकार आपल्या पतीला सांगितला.
त्यानंतर त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या घटनेमुळे दोन्ही मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण (Online teaching) सुरु आहे.
त्यामुळे लहान मुलांच्या हातात स्मार्ट फोन आले.
परंतु आपली मुलं काय करतात, काय पाहतात, कोणाशी मैत्री करतात हे पाहणं देखील पालकांचे कर्तव्य आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.