Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA न्वये CP अमिताभ गुप्तांकडून 47 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 47 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई (Pune Crime) केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रविंद्र उर्फ बल्ली वसंत कांबळे (वय-30 रा. डायस प्लॉट, गुलटकेडी) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे (criminal) नाव आहेत. कांबळे याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (harsul jail aurangabad) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

बल्ली कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह स्वारगेट, खडक (Khadak Police Station), विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishrambaug Police Station) परिसरात कोयता, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर (Senior Police Inspector Balasaheb Kopner) यांनी आरोपी कांबळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गुन्हेगारावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 47 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | pune Criminal send to harsul jail for 1 year in Aurangabad ! CP Amitabh Gupta has taken action against 47 people under MPDA

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा

Pune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली ‘धमकी’ ! पुण्यातील तरूणानं जीवन संपवलं, मामा अन् भाचीवर FIR; सुसाईड नोट सापडली अन्…

Pune Crime | पुण्याच्या कल्याणीनगरमधील कॉल सेंटरमध्ये घुसून 22 वर्षाच्या तरूणीचा ‘विनयभंग’

Pune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV मध्ये कैद; पोलिसांकडून अटक (व्हिडीओ)