Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाचा प्रयत्नातील (Attempt To Murder) फरार सराईत गुन्हेगाराला (Absconding Pune Criminals) गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. करण दशरथ भोसले (Karan Dashrath Bhosle) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव (Pune Crime) आहे. आरोपीने 26 मार्च रोजी एमएसईबीच्या (MSEB) कामाची देखभाल करणाऱ्या अक्षय नवणे (Akshay Navne) याला लाकडी बांबु, लोखंडी रॉड, पाईपने डोक्यात, पाठीवर व हातावर मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता.

याबाबत एमएसईबीचे ठेकेदार स्वप्नील मासाळ Contractor Swapnil Masal (वय-31 रा. पिसोळी गावठाण) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचे पिसोळी येथे एमएसईबीची अंडरग्रांऊड केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यावेळी आरोपी हे त्यांच्या टेम्पोमधून त्या ठिकाणी आले व त्यांनी टेम्पो रोडवर उभा केला. जखमी अक्षय नवणे यांनी टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने 6 जणांच्या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी IPC 307, 323, 504, 143, 147, 148, 148 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन तिघांना अटक केली. तर तीन जण फरार झाले. (Pune Crime )

या गुन्ह्यातील तीन आरोपींचा गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी (Pune Police) व अंमलादर शोध घेत होते. त्यावेळी गुन्ह्यातील फरार आरोपी करण दशरथ भोसले (वय-25 रा. मु.पो. पालखुर्दता, वेल्हा) हा आंबेगाव पठार (Ambegaon Pathar) येथील साई सिद्धीचौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यवर कोंढाव पोलीस ठाण्यात खंडणी (Ransom) व गंभीर दुखापतीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, नामदेव रेणुसे, संजय जाधव, नागेश राख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal Who Abscond In Attempt To Murder Case


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 6 जण ताब्यात

Tata IPL 2022 | …म्हणून आयपीएलचा पुण्यातील ‘हा’ सामना हलवला मुंबईला, वाचा सविस्तर

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा