Tata IPL 2022 | …म्हणून आयपीएलचा पुण्यातील ‘हा’ सामना हलवला मुंबईला, वाचा सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tata IPL 2022 | आयपीएलच्या 15 हंगामालाही कोरोनाची नजर लागली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघामधील फिजिओ पॅट्रिक फरहार्ट (Patrick Farhart) यांना सर्वात आधी कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यानंतर संघातील खेळाडू मिचेल मार्शची (Mitchell Marsh) रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता. मात्र त्याची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला मात्र दिल्ली संघाचा उद्याचा पुण्यामध्ये (Pune) होणारा सामना मुंबईमध्येच (Mumbai) होणार आहे. (Tata IPL 2022)

आयपीएलच्या नियोजित वेळापत्रकानुसार 20 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यामध्ये सामना होणार होता. मात्र कोरोनामुळे हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर (Brabourne Stadium) होणार आहे. प्रवासामध्ये कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची माहिती बीसीसीआयने (BCCI) दिली आहे. (Tata IPL 2022)

दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांना कोरानाची लागण झाली होती. त्यानंतर मार्श हा अनेकवेळा त्यांच्या संपर्कात आल्याने मार्शही पॉझिटिव्ह आला होता. मिचेल मार्श हा दिल्लीच्या संघाकडून पहिल्यांदा मैदानात उतरला होता त्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्या सामन्यात मार्शने अवघ्या 14 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर त्याला कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती.

दरम्यान, संघातील सर्व स्टाफसह खेळाडूंची कोरोना चाचणी (Corona Test ) करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र तरीही उद्या सामन्याआधी पुन्हा एकदा सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Tata IPL 2022 | dc vs pbks match venue changed from pune to mumbai brabourne stadium after covid 19 cases in delhi camp tata IPL 2022


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MNS | मनसेची आणखी एक मोठी घोषणा ! अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर…

Cristiano Ronaldos Newborn Son Died | दुर्देवी ! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात बालकाचा मृत्यू, ट्विट करून दिली माहिती

Achalpur Violence Case | अचलपूर हिंसाचार प्रकरणात भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ महत्वाचे बदल; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक

BSNL Best Recharge Plan | बीएसएनएलचा बेस्ट प्लॅन ! 797 रुपयांत SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह अनेक सुविधा