Pune Crime | बालाजीनगरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील बालाजीनगर (Balajinagar) परिसरात तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन त्याला पाया पडायला लावून त्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Goes Viral) करणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात (Pune Crime) सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar police) काही गुन्हेगारांना (Pune Criminals) यापुर्वी अटक (Arrest) केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई आळंदी रस्त्यावरील (Alandi Road) विश्रांतवाडी-कळस (Vishrantwadi-Kalas) येथील एका हॉटेलसमोर सापळा रचून करण्यात आली.

 

सल्ल्या उर्फ सलमान हनिफ शेख Salla alias Salman Hanif Sheikh (वय-22 रा. रजनी कॉर्नर, बालाजी नगर, धनकवडी-Dhankawadi) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्ल्या शेख याचे साथिदार सौरभ भगत, आदेश बिरामणी, सँडी उर्फ संदीप शेंडकर, आपान शेख, सुफीयान व त्याच्या तीन ते चार साथीदारांनी एका तरुणाला ‘तु पुर्वी आमच्या गँग (Criminal Gangs In Pune) सोबत राहत होता, आता का राहात नाही’ अशी धमकी देऊन त्याला लकाडी दांडक्याने मारहाण केली. (Pune Crime)

 

तसेच तरुणाला मारहाण करीत, गुडघ्यावर बसून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. त्यावेळी आपान शेख याने हा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या घटनेनंतर आरोपींनी हातात तलवार, कोयते, लोखंडी सळई घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्याचेही चित्रीकरण करुन तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ समोर आल्यानंतर सहकारनगर पोलीस खडबडून जागे झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन काहींना अटक केली.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना मुख्य आरोपी सलमान शेख हा आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी-कळस येथील
एका हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी सापळा रचून आरोपीचा शोध घेतला.
पोलीस आल्याचे पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी असे 7 गुन्हे दाखल आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal of Balajinagar incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..