Pune Crime | मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात मोबाईल (Mobile Theft) आणि जबरी चोरी (Robbery) करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने (Pune Police Crime Branch Unit 3) अटक केली (Pune Crime) आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशाल संजय लोखंडे Vishal Sanjay Lokhande (वय-22 रा. हडपसर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा शोध गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस घेत होते. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बिबवेवाडी येथील सराईत गुन्हेगार विशाल लोखंडे हा बिबवेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. (Pune Crime)

 

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे केलेल्या तपासात पोलिसांनी 6 मोबाइल हँडसेट,चोरीचे 3 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह 1 लाख 17 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत हडपसर पोलीस ठाण्यातील 6, कोंढवा (Kondhwa Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी विरुद्ध पुणे शहरात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे (PSI Dattatraya Kale), पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे,
रामदास गोणते, विल्सन डिसोझा, संजीव कळंबे, सोनम नेवसे, राकेश टेकावडे, दिपक क्षिरसागर, प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते,
भाग्यश्री वाघमारे, सुजित पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests mobile thief seizes Rs 1 lakh worth of mobiles

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा