Pune Crime | पुण्यातील सिंहगड रोडवर चौथ्या मजल्यावरुन उडी मारून 26 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून एका 26 वर्षीय महिलेने आत्महत्या (suicide) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात आज (शनिवार) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

या घटनेची नोंद सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधीका पवन ससाने Radhika Pawan Sasane (वय-26 रा. माधुरी मिलिंद कॉम्पलेक्स) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सिंहगड रोडवरील अभिरुची मॉल (Abhiruchi Mall) समोर ही घटना घडली आहे. महिलेने चौथ्या मजल्यावरुन उडी (jumping from fourth floor) घेतल्यानंतर तिला जखमी अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

 

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सिंहगड रोड पोलिसांनी मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनसाठी पाठवून दिला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | radhika pawan sasane commits suicide by jumping from fourth floor on sinhagad road Huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘गुंडगिरी’चा शेवट ‘गुंडगिरी’तूनच ! संतोष जगतापचा खून 2011 च्या मर्डरच्या बदल्यासाठी? जाणून घ्या संपुर्ण स्टोरी

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक (व्हिडिओ)

Sanjay Raut | संजय राऊतांचे सूचक विधान, म्हणाले – ‘एकतर राज्यपाल राहतील नाही तर…’