Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर बलात्कार, नराधमाला 10 वर्षाची सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) झोपलेल्या मुलीला शौचालयात नेऊन बलात्कार (Rape In Pune) करणाऱ्या नराधमास 10 वर्षे सक्तमजुरी (Hard Labor) आणि 6 हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख (District Judge Sanjay Deshmukh) यांनी हा आदेश सुनावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद (Pune Crime) केले आहे.

 

स्वप्नील रवींद्र खोबे Swapnil Ravindra Khobe (वय – 30 रा. चिंचवड – Chinchwad) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विलास पटारे (Adv. Vilas Patare) यांनी काम पाहिले. महिला पोलीस उपनिरीक्षक एम. एस. कवटीकवार (PSI M.S.Kavatikwar) यांनी या प्रकरणाचा तपास केला. ही घटना 4 जून 2019 रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली होती. पीडिता मुळची बिहारची (Bihar) आहे. (Pune Crime)

पीडित मुलगी पुणे रेल्वे स्टेशवर झोपली होती. त्यावेळी ‘तुझा फोन कुठे आहे’ म्हणत आरोपीने पीडितेला उठवले.
फोन सापडला नाही. त्याने तिच्या भाभी व भावाच्या फोनवर फोन करुन तिला घरी घेऊन जातो आणि चांगले सांभाळतो असे सांगितले.
परंतु भावाने तिला पोलीस स्टेशनला सोडायला सांगितले.
मात्र त्याने रेल्वे यार्डात दोन रेल्वे गाड्यांच्या शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

 

बलात्काराच्या वेळी ती ओरडायला लागली असता, त्याने तिला बेदम मारहाण (Beating) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड आणि मारहाण (कलम 323) प्रकरणी एक वर्षाचा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | rape of sleeping girl at pune railway station accused 10 years hard labor pune shivaji nagar court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा