Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत असलेल्या एका 23 वर्षाच्या तरुणीला तिचे वडिल जबरदस्तीने घरातील कॉम्प्युटर व त्यांचे मोबाईलवर पोर्नोग्राफीचे व्हिडिओ (Pornography Videos) दाखवत तिचा विनयभंग (Molestation) करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच तिची आई व बहिण हे घरगुती कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण (Beating) करत (Pune Crime) असल्याचे या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार 2010 ते 2021 दरम्यान येरवडा (Yerwada) येथील कल्याणी नगर मधील (Kalyaninagar) एका सोसायटीत सुरु होता. (Pune Crime) याबाबत एका 23 वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिचे वडील (Father), आई (Mother) व बहिणीवर (Sister) विनयभंगासह पोक्सो अंतर्गत (Pocso Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही एका कंपनीत सध्या काम करीत असून तिचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे.
फिर्यादीचे वडील हे तिची इच्छा नसताना वेळोवेळी घरातील कॉम्प्युटर व त्यांचे मोबाईलवर पोर्नोग्राफी व्हिडिओ दाखवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
तिची आई व बहिण यांनी फिर्यादी यांना घरगुती कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण केली.
बहिणीने फिर्यादीचे अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ काढले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादीने आपली तक्रार प्रथम हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) दिली होती.
तेथून ती वर्ग होऊन येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा