Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 36 वर्षाच्या विवाहित महिला डॉक्टरचे नग्न व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – डॉक्टर महिलेला (woman doctor) लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडले. महिलेला कपडे काढण्यास सांगून नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड करुन ते व्हायरल (video and photos viral) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा प्रकार घडला असून 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी प्रणव अरविंद पांचाळ Pranav Arvind Panchal (रा. अटलादरा, जि. वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी 36 वर्षाच्या पीडित महिलेने शुक्रवारी (दि.8) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून डॉक्टर आहे. प्रणव पांचाळ याने फिर्यादी महिलेशी लग्न करण्याचा बहणा करुन तिला मोबाईलवरुन व्हॉट्सअ‍ॅपवर बोलण्यास भाग पाडले. तसेच त्यांना कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड (Screen record) केले व त्यांचे नग्न फोटो फिर्यादीच्या मेलवर व्हायरल केले.

याशिवाय फिर्यादीच्या पतीच्या मोबाईल वर व्हिडिओ पाठवले.
तसेच त्याचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करण्यासाठी फिर्यादीला वारंवार मोबाईलवर संपर्क केला.
फिर्यादीच्या नातेवाइकांना फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य व बदनामी करुन महिलेचा विनयभंग केला,
असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान फिर्यादी महिला डॉक्टरचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking! video and photo of a 36-year-old married woman doctor goes viral in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा दरमहिना 100 रुपयांची गुंतवणूक, होईल लाखोचा फायदा

Datsun Go | झीरो डाऊन पेमेंटवर 2.1 लाखात खरेदी करा Datsun Go, कंपनी देईल मनी बॅक गॅरंटीसह वॉरंटी प्लान; जाणून घ्या