
Pune Crime | एक्सप्रायरी डेट उलटून गेल्याचे दाखविल्याने दुकानदाराने केली ग्राहकाला बेदम मारहाण, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावरील घटना
पुणे : Pune Crime | उपवासाच्या राजगिरी वडीच्या पाकिटाची एक्सप्रायरी डेट (Expiry Date) उलटून गेल्याची दुकानातील पाकिटे दाखविल्याबद्दल ग्राहकाचे आभार मानण्याऐवजी त्याला दुकानदाराने लोखंडी पट्टीने ग्राहकाच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी जितेंद्र भास्कर माळवदकर Jitendra Bhaskar Malwadkar (वय ३९, रा. शुक्रवार पेठ – Shukrawar Peth) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेंद्र सोळंकी Mahendra Solanki (रा. विजय सुपर मार्केट Vijay Super Market, सुभाषनगर Subhas Nagar) या दुकानदाराविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाषनगरमध्ये महेंद्र सोळंकी यांचे विजय सुपर मार्केट आहे. या दुकानातून फिर्यादी यांच्या मुलीने उपवासाच्या राजगिरा वडीचे पाकिट विकत घेतले होते (Pune Crime). फिर्यादी यांना राजगिरा पाकिटाची एक्सपायरी संपली असल्याचे लक्षात आले. ते सोमवारी सकाळी दुकानात गेले व तेथे पाहिले तर १५ ते २० पाकिटांची एक्सपायरी संपलेली पाकिटे आढळून आली. तेव्हा त्यांनी याबाबत दुकानदार महेंद्र सोळंकी यांच्याकडे विचारपूस केली. त्याचा राग येऊन सोळंकी याने दुकानातील लोखंडी पट्टी फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. पोलीस हवालदार मते तपास करीत आहेत.
Stock Market | गुंतवणूकदारांना दिलासा ! आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी
ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले