Pune Crime | …म्हणून मुलीने स्वत:च्याच वडिलांवर केला 420 चा गुन्हा दाखल; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आजोबांनी नातीच्या लग्नासाठी २६ लाख रुपये म्युच्युल फंडात (Mutual Funds) ठेवली होती. ती मुलीच्या वडिलांनी परस्पर काढून त्या पैशांची अफरातफर केली, असा आरोप करत मुलीने आपल्या वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा (Cheating Case) दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी नाशिक (Nashik) येथील मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात Samarth Police Station फिर्याद (गु. रजि. नं. ८२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमवार पेठेत (Somwar Peth, Pune) राहणार्‍या ५२ वर्षांच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ जानेवारी २०१८ रोजी रास्ता पेठेतील बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India) घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नाशिक येथे रहात आहेत. त्यांच्या आजोबांनी त्यांच्या हयातील स्थावर व जंगम मिळकतीबाबत २ मृत्युपत्र करुन ठेवले होते. यापैकी एक नोटराईज्ड असून दुसरे २०१० मध्ये सब रजिस्ट्रार यांच्याकडे नोंदवलेले आहे. या मृत्युपत्रात फिर्यादी यांना वाटा हिस्सा दिलेला आहे. नाशिक येथील मिळकत ही त्यांच्या आजोबांच्या स्वत:च्या कष्टार्जित रक्कमेतून विकत घेतली व त्यामध्ये स्वत: च्या मुलाचे नाव घेतलेले आहे. मात्र, यामध्ये फिर्यादी यांचे वडिल यांनी कोणतीही रक्कम गुंतवलेली नाही. त्यांच्या आजोबांनी ही मिळकत फिर्यादी यांना मिळावी, असे तोंडी सांगितले असून लेखी लिहिलेले आहे. हे मृत्युपत्र  त्यांच्या आजोबांनी पुण्यातील घरी ठेवले होते. त्यांचे अचानक निधन झाल्याने त्यांची दोन्ही मृत्युपत्र व मिळकतीसंबंधीचे सर्व कागदपत्रे फिर्यादी यांच्या आत्याच्या कब्जात आहेत. फिर्यादी यांनी या मृत्युपत्राच्या प्रती वडिलांकडे मागितल्या़ त्या देण्यास त्यांनी नकार दिला.

फिर्यादी यांच्या लग्नासाठी त्यांच्या आजोबांनी अ‍ॅक्सीस म्युचअल फंडात २६ लाख रुपये वेळोवेळी जमा केले होते. फिर्यादी यांच्या वडिलांनी जबरदस्तीने त्यांच्या बचत खात्यावर स्वत:चे नाव लावून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय २५ जानेवारी २०१८ रोजी २६ लाख रुपये म्युचअल फंडातून काढून अन्य म्युचअल फंडात टाकले. ही रक्कम फिर्यादी यांच्या लग्नासाठी त्यांचे आजोबांनी ठेवलेली होती. या रक्कमेवर त्यांच्या वडिलांचा कोणताही हिस्सा नाही. त्यांनी फसवणूक करण्याच्या इराद्याने या पैशांची अफरातफर (Fraud Case) करुन फिर्यादी यांची फसवणूक केली व ही रक्कम स्वत:चे नावावर करुन ठेवली आहे. फिर्यादी यांच्या आजोबांनी तिचे नावे ठेवलेली रक्कम तिचे वडिलांनी मुद्दाम स्वत:चे नावे अन्य म्युचअल फंडात गुंतवणुक केली, म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, म्हणून फिर्यादी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन अर्ज केला होता. न्यायालयाच्या निर्णयानुसार समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : Pune Crime | … so the daughter filed a 420 (Cheating) case against her own father; Incidents in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त