Pune Crime | पुण्यात SRPF च्या परिक्षेसाठी भावाच्या नावावर बसला; ‘ब्ल्यु टुथ’द्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | SRPF च्या रविवारी झालेल्या लेखी परिक्षेत एका तरुणाने आपल्या भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्याने ब्ल्यु टुथद्वारे (Bluetooth) कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला अटक करण्यात (Pune Crime) आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विशाल गबरुसिंग बहुरे Vishal Gabrusingh Bahure (रा. जोडवाडी, औरंगाबाद – Aurangabad) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भरतसिंग गबरुसिंग बहुरे Bharatsingh Gabarusingh Bahure (रा. जोडवाडी, औरंगाबाद) या त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SRPF भरतीची रविवारी लेखी परिक्षा होती. हडपसर (Hadapsar News) येथील एस एम जोशी कॉलेजमध्ये (S.M.Joshi College, Hadapsar, Pune) या परिक्षेचे केंद्र होते. यावेळी विशाल हा त्याचा भाऊ भरतसिंग याच्या नावाने लेखी परिक्षा (SRPF written examination) देण्यास आला होता. परिक्षा देत असताना त्याने कॉपी (Copy) करण्यासाठी ब्ल्यु टुथचा वापर करीत असल्याचे आढळून (Pune Crime) आले.

त्याला जागेवरच पकडण्यात आले असून सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर (API Padsalkar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | SRPF exam in Pune; Attempt to copy by Blue Tooth, arrested by Hadapsar police

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरुय, CBI चौकशी झाली पाहिजे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 699 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nora Fatehi-Guru Randhava Dating | गुरू रंधावासोबत गोव्यात मस्ती करताना दिसली नोरा फतेही; नेटकरी म्हणाले – ‘पंजाबला अजून एक सून भेटली’

Wrestling Competition | शिवराय कुस्ती संकुलच्या मोईन पटेलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Pune Crime | SRPF जामखेड ग्रुप भरतीच्या परीक्षेत ‘मुन्नाभाई’चा प्लान फसला; पुण्याच्या कोथरूड पोलिसांकडून औरंगाबादच्या कॉपीबहाद्दरावर कारवाई