Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने गुंडांचा तरुणावर कोयत्याने हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मध्यरात्रीच्या सुमारास गुंडाच्या (Pune Criminals) एका टोळक्याने दारुसाठी पैसे देण्यास नकार दिलेल्या तरुणावर पालगन व कोयत्याने वार करुन जबर जखमी (Pune Crime) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला.

या प्रकरणी दीपक बाबु धोत्रे Deepak Babu Dhotre (वय ३७, रा. भाजी मार्केट, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निलेश/पिनया संजय साळवे, निखिल /पप्या संजय साळवे, ओंकार / उब्या जगधने, आद्या कांबळे (सर्व रा. येरवडा) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. निलेश, निखिल आणि ओंकार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहे.

येरवड्यातील यशवंतनगर येथे दीपक धोत्रे हे ७ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता थांबले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करुन दारूसाठी पैशांची मागणी केली. त्याला दीपक यांनी नकार दिल्याने त्यांनी पालगन व कोयत्याने त्यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांनी त्यांच्याकडील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | The goons tried to kill the youth by attacking him with
a scythe for not paying for alcohol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर