Pune Crime | कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील अट्टल गुन्हेगार रूपेश मारणे वर्षभरासाठी स्थानबध्द ! पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 50 जणांवर MPDA ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगार रुपेश कृष्णराव मारणे Rupesh Krishnarao Marne (वय -38 रा. नवएकता कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 50 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

 

कुख्यात गुंड गजानन मारणे (Gangster Gajanan Marne) तळोजा करागृहातून (Taloja Jail) बाहेर पडल्यानंतर त्याची मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) रॅली (Rally) काढण्यात आली होती. याप्रकरणात रुपेश मारणेसह इतरांना कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) अटक केली होती. तसेच रुपेश मारणे याने जमाव बंदीचे उल्लंघन करुन मध्यरात्री भररस्त्यात वाढदिवसाचा केक कापून नागरिकाला धमकावले होते. याप्रकरणी त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रुपेश बारणे याच्यावर कोथरुड, वारजे माळवाडी (Warje Malwadi Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), येरवडा (Yerawada Police Station), पौड (Paud Police Station) , तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade Police Station), समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथिदारांसह तलवार, कोयता, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांह फिरताना खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), खंडणी (extortion case), दुखापत, दंगा, सरकारी कामात अडथळा, साथीचारोग प्रतिबंधक उपाय योजनांचे उल्लंघन, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मागील 18 वर्षात 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

 

रुपेश मारणे याच्या दहशतीमुळे नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते.
मारणे याच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
प्रस्तावाची पडताळणी करुन रुपेश बारणे याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत
एक वर्षासाठी ओरंगाबाद (Aurangabad) येथे स्थानबद्धतेचे (harsul jail aurangabad) आदेश दिले आहेत.
कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ (Kothrud Police Station) पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap),
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात तब्बल 50 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime) केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | The notorious goon Gajanan Marane gang’s hardened criminal Rupesh Marane has been stationed for a year ! MPDA action against 50 so far by Police Commissioner Amitabh Gupta Kothrud Police Station Gangster gajanan marne

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा