Pune Crime | हातात कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवणारा ‘भाई’ गजाआड, वाकड पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक भाई नव्याने तयार होत असून ते दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) यासारख्या सोशल मीडियाचा (Social Media) वापरत करत असल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे, पिस्तूलाचा व्हिडिओ (pistol) व विविध प्रकारची चेतावणी वजा धमकीचे स्टेटस ठेवून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक घटना पुणे (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या आहेत.

 

वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad police station) तपास पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपी कृष्णा तुळशिराम राऊत Krishna Tulshiram Raut (वय-22 रा. काळा खडक, वाकड) हा हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी डेअरी फार्म (Dairy Farm) समोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासला असता त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटस वर शेअर चॅटवरुन (Share chat) डाऊनलोड केलेला पिस्टलचा व्हिडिओ ठेवल्याचे आढळून आले. आरोपी विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.(Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addi CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite),
सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disley)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर
(Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव (API Abhijeet Jadhav), पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल (PSI Ganesh Torgal), पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे, अतिष जाधव, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रमोद कदम, व कैतेय खराडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Wakad Police Arrest Criminal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Lockdown | ‘राज्यात 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागल्यास Lockdown – राजेश टोपे

Omicron Restrictions Pune | पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ! ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध; जाणून घ्या सविस्तर

Kirit Somaiya | ‘अनिल परब यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार’

Pune Crime | बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या आशिष पाटणे याच्यावर गुन्हे शाखा युनिट 5 कडून कारवाई

बिहारमध्ये उंदरांचा नवीन ’कारनामा’, दारू आणि धरणानंतर आता X-Ray मशीनला केले टार्गेट, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण