Shahir Hemantraje Mavale | ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा शाहीर हेमंतराजे मावळेंकडून निषेध, ‘व्यसनमुक्ती’ पुरस्कार केला परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील द्राक्ष बागायदार तसेच वाईन उद्योगाला (Wine Industry) चालना मिळावी यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government) गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) राज्यातील सुपर मार्केट (Supermarket) तसेच ‘वॉक इन स्टोअर’ (Walk in Store) मध्ये वाईन विक्रिस परवानगी (Permission) दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपने (BJP) विरोध केला आहे. दरम्यान, पुण्यातील शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे (Shahir Hinge Folk Art Academy Pune) शाहीर हेमंतराजे मावळे (Shahir Hemantraje Mavale) यांनी देखील या निर्णयाचा निषेध केला आहे. शाहीर हेमंतराजे मावळे (Shahir Hemantraje Mavale) यांनी त्यांना मिळालेला व्यसनमुक्ती पुरस्कार परत केला आहे.

 

राज्य सरकारने वाईन संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे भाजने विरोध दर्शवत राज्य सरकारवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे (Shahir Hemantraje Mavale) यांनी त्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल मिळालेला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार (Rashtrapita Mahatma Gandhi De-Addiction Award) रविवारी (दि.30) महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुणे स्टेशन (Pune Station) येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ठेवून सरकारच्या या धोरणाचा निषेध केला.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, मी मागील अनेक वर्षापासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करत आहे.
शाहिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार करत आहे. त्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून पहिला मला पुरस्कार दिला.
मात्र सरकार जर अशा प्रकारचा निर्णय घेत असेल तर हा पुरस्कार माझ्या जवळ ठेवणे योग्य नाही.
त्यामुळे मी हा पुरस्कार सरकारला परत करत आहे आणि शासनाची सद्सद्विवेकबुद्धी जागी होवे अशी प्रार्थना करतो.

 

Web Title :- Shahir Hemantraje Mavale | shahir hemantraje mavale returned the governments deaddiction award

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा