Pune Crime | महिलेचा तिच्या पतीसमोर सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि मॅनेजरकडून विनयभंग, पुण्यातील विमानतळ परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बँक लिलावात खरेदी केलेल्या फ्लॅटचे कागदपत्र जमा करण्यासाठी बोलावून घेत एका महिलेचा तिच्या पतीसमोर सोसायटीच्या (Society) चेअरमन (Chairman), सेक्रेटरी (Secretary) आणि मॅनेजरने (Manager) विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार विमानतळ (Viman Nagar) परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आरपोडीयमच्या केबीनमध्ये (Rpodium Cabin) 25 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 च्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याप्रकरणी विमानतळ परिसरात राहणाऱ्या 45 वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पिडित महिलेने विमानतळ परिसरातील सोसायटीमधील फ्लॅट बँक लिलावात (Bank Auction) घेतला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांना फ्लॅटचे कागदपत्रे जमा करण्याच्या कारणावरुन सोसायटीच्या आरपोडीयमच्या केबीनमध्ये बोलावून घेतले. (Pune Crime)

 

फिर्यादी आणि त्यांचे पती हे कागदपत्र घेऊन आले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तसेच फिर्यादी यांच्या पतीला मारहाण (Beating) करुन डाव्या कानावर मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Woman molested by society’s chairman, secretary and manager in front of her husband, incident at Pune Viman nagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Heena Panchal Superhot Photo | मराठमोळी मलाइका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना पांचाळनं शेअर केला क्लीवेज फोटो, मादक फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान

 

Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | पुण्याच्या कात्रज परिसरात 20 सिलेंडरचे स्फोट ! अवैध सिलेंडरचा मोठा साठा जप्त

 

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नाराज केलं जातंय, कधीतरी स्फोट होणार’ – रावसाहेब दानवे