×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | प्लंबिंग कामगाराचा विजेचा शॉक बसून मृत्यू; ठेकेदारावर FIR, पुण्यातील...

Pune Crime | प्लंबिंग कामगाराचा विजेचा शॉक बसून मृत्यू; ठेकेदारावर FIR, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सदनिकेमध्ये प्लंबिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील वारजे परिसरातील व्होयला सोसायटीमध्ये (Pune Crime) घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दयानंद तारक बनसोडे (वय 39, रा. वनलिका सोसायटी, लवळे फाटा, पिरंगुट) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बनसोडे याचा भाऊ अजित बनसोडे (वय 36) यांनी वारजे पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्लबिंग ठेकेदार विनित गोविंद गाडगीळ (वय 55, रा. कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरातील व्होयला सोसायटीमध्ये एका सदनिकेत दयानंद हे प्लंबिंगचे काम करत होते. त्यावेळी बाथरूममध्ये त्यांना विजेचा जोरात धक्का बसला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बनसोडे यांना काम करत असताना सुरक्षाविषयक साहित्य न पुरविल्याने ही दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघड झाले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार गाडगीळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रायकर करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | worker dies of electric shock while doing plumbing work in flat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Manmohan Hospitalized | हार्ट अटॅक आल्याने सिने निर्माते नितीन मनमोहन रुग्णालयात; प्रकृती चिंताजनक

Mumbai Gangrape | धक्कादायक ! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

Uddhav Thackeray | ‘महाविकास’ सरकार पाडण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्‍याबाबत शिवसेनेने केला मोठा दावा,

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे

Must Read
Related News