Pune Crime | धक्कादायक ! मुलीला त्रास दिल्याच्या आरोपावरुन तरुणाला कोंडून बेदम मारहाण, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या मुलीला (Daughter) त्रास (Harassment) देतो असा आरोप (Allegations) करुन मुलीच्या कुटुंबीयांनी (Girl Parent) एका तरुणाला बेदम मारहाण (Youth Beaten) केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील शिवणे परिसरात (Shivane Area) घडली असून पोलिसांनी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

शिवणे परिसरातील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट (Dangat Patil Industrial Estate) येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडेन्सी (Sai Shraddha Residency) मधील वंदना नावाच्या महिलेने आपल्या मुलीला त्रास देतो म्हणून तरुणाला मारहाण केली. या तरुणाला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यामध्ये प्रद्युन्य प्रकाश कांबळे Pradyunya Prakash Kamble (वय – 22 रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता Senapati Bapat Road) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी प्रद्युन्य कांबळे हा मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्यावेळी मुलीच्या आईने घरात का आलास ? असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर प्रद्युन्य कांबळे याला घरात कोंडून बेदम मारहाण करुन जखमी केले. (Pune Crime)

 

त्यानंतर प्रद्युन्य कांबळे हा तिथून निसटून पळाला असता त्याचा पाठलाग करुन दांगट पाटील नगर रोडवर त्याला दोन तरुणांच्या मदतीने मारहाण केली. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे (Warje Malwadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke) आणि त्यांचे पथक घटनास्थळी गेले त्यावेळी तरुणाला मारहाण करुन दोन जण रिक्षामधून पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

प्रद्युन्य प्रकाश कांबळे याला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (Mai Mangeshkar Hospital) दाखल करण्यात आले.
त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी संबंधित महिला, तिचा पती आणि त्याच्या मित्राला वारजे पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युन्य प्रकाश कांबळे हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.
त्याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) तीन गुन्हे दाखल आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | youth beaten to death by girl parents over allegation of he harassed their daughter warje malwadi pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा