महिन्याला 5 हजाराचा हप्ता द्या म्हणून ‘भाईगिरी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिन्याला 5 हजार रुपयांचा हप्ता देण्यास नकार देणार्‍या एका हॉटेल व्यावसायिकाला सराईताने धमकावत त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगकरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश विशाल पवार (वय 19, रा. वडगांव शेरी) याला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात 41 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश पवार हा अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे. अल्पवयीन असताना त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. तर, मध्यंतरी एक जबर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, फिर्यादी यांचे नेहा नावाचे वडगांव शेरीत हॉटेल आहे. हॉटेलात रितेश पवार हा शुक्रवारी दुपारी आला होता. त्याने फुकट जेवण देण्याची मागणी केली.

परंतु, फिर्यादींना त्याला नकार दिला. यावेळी त्याने धमकावत महिन्याला 5 हजार रुपयांचा हप्ता मागितला. हप्ता देण्यास देखील फिर्यादींनी नकार दिला. यावेळी रितेशन याठिकाणी गोंधळ घालत स्वतच्याच अंगावर रॉकेल ओतून घेतले. तसेच, जाळून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर व्यावसायिकाला जिस दिन मिलेगा उस दिन मुंडी कट करके पोलीस स्टेशन मे भेज दुंगा अशी धमकी दिली. धमकी देतानाचे व्हिडीओ चित्रीकरणही केले. तसेच, तो येथून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी पोलीसांकडे तक्रार दिली. पोलीसांनी रितेशला अटक केली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक बलभिम ननावरे यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/