Pune : कात्रजच्या जंगलातून बिबट्याला पकडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कात्रज परिसरातील जंगलातून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका बिबट्याला मध्यरात्री पकडले. त्याला कात्रज येथील प्राणी संग्रालयात नेण्यात आले आहे.

कात्रज परिसर डोंगर आणि झाडी मोठ्या प्रमाणात आहे. या भागात लोकवस्ती देखील वाढली आहे. त्यामुळे अधूनमधून बिबटे व इतर प्राणी पक्षी पहिला मिळतात. मात्र बिबट्या दिसल्यानंतर नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण होते. काही दिवसांपूर्वी याच परिसरात मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या घडकेत वाघाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान शुक्रवारी रात्री देखील वनविभागाला बिबट्याची माहिती मिळाली होती. यावेळी वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यानी बिबट्याला पकडण्यास पिंजरा लावला होता. अथक प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात वन विभागाला यश आले. बिबट्याला कात्रज प्राणी संग्राहलयात नेण्यात आले आहे.