Pune Drug Case | ससून ड्रग्ज रॅकेट : ललित पाटीलची कोट्यवधीची संपत्ती, शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने नाशकात तळ ठोकला

नाशिक : Pune Drug Case | ससून ड्रग्ज रॅकेटमधील (Sassoon Hospital Drugs Case) मुख्य आरोपी ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याने ड्रग्जमधून कमावलेला पैसा विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे पोलिसांचे (Pune Police) एक पथक यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीवरून त्याच्या मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. मित्र, नातेवाईक, जवळच्या व्यक्तींच्या नावावर त्याने कोट्यवधीची संपत्ती खरेदी केली आहे. (Pune Drug Case)

ललित पाटील हा नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याला एका ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात (Yerwada Jail) होता. येथे आजारपणाचे नाटक करत त्याने ससून रुग्णालयात मुक्काम ठोकला. यानंतर तो ससूनमध्ये नऊ महिने राहिला आणि येथूनच तो आपले ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्याच्या एका माणसाकडे ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

यानंतर ललित पाटील रूग्णालयातून फरार झाला आणि या प्रकरणात अनेक मोठ्या धेंडांची नावे घेतली जाऊ लागली. महाराष्ट्राच्या राजकारणातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले, दोन मंत्र्यांची नावे या प्रकरणात विरोधकांनी घेतली होती.

संपत्तीकडे मोर्चा वळवला
दरम्यान, फरार ललित पाटीलला पंधरा दिवसांनी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कर्नाटकात अटक केली होती. या प्रकरणात त्याच्यासह १५ पेक्षा जास्त व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आता पोलिसांनी त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वळवला आहे. (Pune Drug Case)

पाच किलो सोने जप्त
ललित पाटीलच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये तळ ठोकून बसले आहे. ललित पाटीलने ड्रग्जच्या पैशांतून आठ किलो सोने घेतले होते. यापैकी पाच किलो सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सोने विकणाऱ्या सराफावरही कारवाई केली आहे.

फॉर्च्युनर गाडीसह ३ गाड्या जप्त
ललित पाटीलने ड्रग्जचा पैसा फ्लॅट, जमिनीत देखील गुंतवला आहे. मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केलेल्या
या कोट्यवधीच्या संपत्तीचा शोध पोलिस घेत आहेत. गुरुवारी पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये आल्यानंतर या
पथकाने ललित पाटीलच्या फॉर्च्युनर गाडीसह तीन गाड्या जप्त केल्या.

निबंधक कार्यालयातून शोध
ललित पाटील याने ड्रग्सच्या पैशांतून फ्लॅट, प्लॉट आणि इतर मालमत्ता घेतली आहे.
त्याची मोजदाद आणि शोध पोलिसांनी सुरू केला आहे. यासाठी नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून माहिती घेतली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार

NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल