शिरूर तालुक्यात घराला आग लागुन तिघांचा होरपळून मृत्यू

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्‍ल वस्तीमधील घराला आग लागुन तिघांचा होरपळुन मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यामुळे संपुर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली आहे. आगीचे कारण अद्याप समजु शकलेले नाही.

दादू लालू गावडे (2), प्रांजल अरूण पवार (2) आणि लालू अनंता गावडे अशी मयतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी मी, तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्‍ल वस्तीमध्ये गावडे कुटुंब हे गेल्या 15 वर्षापासुन रहावयास आहे.

गावडे यांच्या घरावर ऊसाचे पाचट टाकण्यात आले होते. घरात स्वयंपाक करीत असताना आग लागली असावी असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. आगीत बापलेक आणि एक मुलगी मृत झाले आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Loading...
You might also like