Pune Fire News | कसबा पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Fire News | कसबा पेठेतील जुन्या लाकडी वाड्याला पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. वाडा बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. (Pune Fire News)

कसबा पेठेतील शनिवारवाडा परिसरात पेशवेकालीन मोटे मंगल कार्यालयाजवळ जुना महाजन वाडा (Mahajan Wada) आहे. गेली २० ते २५ वर्षे वाडा पडीक आहे. या तीन मजली वाड्याला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. संपूर्ण वाड्याने पेट घेतल्यानंतर त्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. लाकडी वाडा असल्याने आगीने लवकर पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या व टँकर घटनास्थळी पोहचले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. (Pune Fire News)

परंतु, आग अगोदर पूर्ण भडकली होती. संपूर्ण वाड्याने पेट घेतला असल्याने या आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झाला आहे. वाड्याचा संपूर्ण कोळसा झाला आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडावर एमपीडीए कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण, महिला पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडून धमकावणी

कामगार नेते यशवंत भोसलेंना 16 लाखांचा गंडा, राष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या खजिनदाराला अटक

सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त