Pune Fire News | गॅस सिलेंडर बदलताना घ्या काळजी, सिलेंडरमधून गॅसगळती होऊन फ्लॅटमध्ये आग; धायरीतील घटनेत पतीपत्नी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅस (Gas Cylinder) गळती होऊन आग लागल्याने त्यात पतीपत्नी जखमी झाले. धायरीतील डी एस के विश्व परिसरातील गणेश नक्षत्र सोसायटीमध्ये शनिवारी रात्री साडेसात वाजता हा प्रकार घडला. सिलेंडर बदलत असताना ही घटना घडली. (Pune Fire News)

 

आरती राहुल साळवी Aarti Rahul Salvi (वय ३७) आणि राहुल दिलीप साळवी Rahul Dilip Salvi (वय ४०) हे पतीपत्नी या घटनेत जखमी झाले आहेत.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी, राहुल साळवी व त्यांची पत्नी आरती हे धायरीतील डी एस के विश्व परिसरातील गणेश नक्षत्र सोसायटीत राहतात. शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आरती किचनमध्ये स्वयपांक करीत होत्या. या वेळी सिलेंडर संपल्याने त्या नवीन सिलेंडर जोडत असताना मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली. जवळच असलेल्या पणतीमुळे आग लागली. आरती या भाजल्याने त्यांना वाचविण्यासाठी गेलेले राहुल हेही त्यात भाजले. (Pune Fire News)

अग्निशमन दलाला (Fire Brigade) याची माहिती मिळता वडगाव खुर्द येथील दत्तात्रय नवले अग्निशमन केंद्राच्या जवानानी तत्काळ घटनास्थळी जाऊन आग विझविली. या घटनेत स्वयंपाक घरातील भिंतीला तडे जाऊन घरगुती साहित्याचे बरेच नुकसान झाले.

 

अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल शिवाजी मुजूमले, जवान भरत गोगावले, शिवाजी आटोळे विक्रम मच्छिंद्र,
औंकार लोखंडे, आदित्य मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

Web Title :- Pune Fire News | Be careful while changing the gas cylinder,
gas leaks from the cylinder and fire in the flat; Husband and wife injured in incident in Dhairi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा