पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जुगारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील पर्वती पायथा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल जुगार खेळणाऱ्या ८ जणांना अटक केली आहे. तर तेथून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विजय एकनाथ उंडाळे (वय ५४, रा. पर्वती गाव), राजकुमार चन्नाप्पा कुंभार (वय ३०, रा. जनता वसाहत पर्वती पायथा), राजेंद्र रामभाऊ आगलावे (वय ३९, पद्मावती), प्रकाश बाबू मोकाशी (वय ४०, रा. जनता वसाहत), लक्ष्मण श्रीपती येनपुरे (वय ५४, रा. किष्किंदानगर), अप्पा भगवान खंडाळे (वय ३९, पर्वती दर्शन), दुर्गेश प्रभाकर काळे (वय ३१, नऱ्हे), मनोज बबन दिवसे (वय ३५, मु. पो. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनीट ३ चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना माहिती मिळाली की, पर्वती गावात बँक ऑफ महाराष्ट्र समोर समर्थ वडेवाले येथील दुकानाच्या बाजूच्या दुकानात मटका, पणती, पाकोळी, सोरट आणि इलेक्ट्रॉनिक्स गेम आणि पत्त्यांचा क्लब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून पंती पाकोळी नावाचा सोरटचा जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. तर जुगार अड्डा चालविणारा विजय एकनाथ उंडाळे याच्यासह ८ जणांना अटक केली. तसेच ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, कर्मचारी राहूल घाडगे, मच्छिंद्र वाळके, गजानन गणबोटे, दत्तात्रय गरुड, सुजीत पवार, सज्जाद शेख, पंढरीनाथ शिंदे यांच्या पथाकने केली.

सिनेजगत

…म्हणून श्रीदेवी साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या तोंडावर थुंकल्या होत्या 

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like