
Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | लाडक्या बाप्पाच्या निरोपाला वरूणराजा बरसला, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष कायम
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीचा (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) दिमाखदार सोहळा लक्ष्मी रोडवर बघायला मिळत असताना सायंकाळी चार वाजता वरुणराजाने देखील बरसला. मुंबई, पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला होता. त्यानुसार वरुणराजाने लाडक्या गणपतीला निरोप देण्यासाठी हजेरी लावली आहे. पाऊस (Pune Rain) सुरु असताना देखील गणेश भक्तांचा उत्साह मात्र कायम होता.
सकाळपासून स्वच्छ वातावरण दुपारपासून ढगाळ होण्यास सुरुवात झाली. साडेतीनच्या सुमारास ढगांचा गडगडाट होऊ लागला. चार वाजल्यापासून पुणे शहर आणि उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. वसर्जन मिरवणूकीत पाऊस आल्याने भाविकांना आणि कार्य़कर्त्यांना अधिकच उत्साह आला. वरुणराजाच्या साक्षीने गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात येत होता. सकाळपासून मिरवणूक (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) पाहण्यासाठी केलेली गर्दी पाऊस आला तरी कमी झाली नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहणारे वारे, विजा आणि मेघगर्जनांसह पावसाच्या
काही जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ढोलताशाच्या तालावर नाचण्याचा आनंद पुणेकर घेत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
ACB Trap Case News | महिला शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठी व कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात